सांजवेल

  • 6.6k
  • 13
  • 2k

खूप दिवसानं आलास रे, आईची आठवण येत नाही वाटत तुला? विनयला चहा देत माझी आई म्हणाली... विनयला गहिवरून आल्यासारख झालं. चहा बाजूला ठेवून विनयने माझ्या आईच्या चरणावर माथा टेकला. चरणावर ओघळलेले अश्रू बघून माझी आई विनयला म्हणाली... मला कळतंय रे तुझ दुःख, मी आहे ना, नको काळजी करू. असे म्हणून माझ्या आईने विनयला जवळ घेतले. काही क्षण विनय आईच्या आठवणीत रमून गेला... माझी आई मला म्हणाली, होऊ दे त्याला मोकळ... विनयला त्याच्या आईच्या आठवणी जाग्या करू दे, त्याशिवाय त्याला हलके वाटणार नाही. आईच्या आठवणीत विनय गढून गेला. आईशी संवाद साधता - साधता आईबरोबर घालवलेला एक – एक क्षण जागा करू लागला...