जिवंत असताना सुख द्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे पिञ जेवु घालण्याचा विधी सर्वञ चालु होता. सुहासच्या घरी सुद्धा तोच कार्यक्रम चालु होता. बरीच पाहुणे मंडळी आली होती. त्याच्या आजोबांना जावुन १ वर्ष झालं असेल. आजोबांच्या फोटो ला टवटवीत फुलांचे हार लखडत होते. सुंगधी अगरबत्ती , दिवा बाजुला तेवत होते. तेवढ्यात एक सुंदर सजवलेले पंचपक्वानाच ताट घेवुन सुहासची आई फोटोजवळ आली. फोटोला अन्न चढवु लागली. १० वर्षाच्या सुहास ला हे सर्व फार कुतुहलात्मक होतं. त्याने न राहुन विचारलं. सुहास - आई हे काय करतेस ? आई - बाळा , तुझ्या आजोबांच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवलेत, त्यांना जेवु घालण्यासाठी . त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती