सोराब नि रुस्तुम - 3

(12)
  • 7.8k
  • 2
  • 3.6k

फार प्राचीन काळची गोष्ट आहे. तशा गोष्टी आता घडत नाहीत परंतु त्या ऐकाव्याशा तर वाटतात कारण त्या गोष्टींतील धडे चिरंजीव असतात. असे अधीर नका होऊ. आता सागंतोच. एका गावात एक सावकार होता. खूप धनदौलत त्याने मिळविली. बरे वाईट करून मिळविली. जिकडे तिकडे त्याची शेती. जिकडे तिकडे त्याच्या बागा. त्याचा वाडा चिरेबंदी, केवढा मोठा चौसोपी होता. जणू किल्लाच. घराला एक तळघर होते. त्यात अपार संपत्ती साठवलेली होती.