राजेश एक मिनिट मी जर आत जाईन तर तुला घेऊनच जाईन.. आणि आपण सुद्धा एका देवीच्याच दर्शनाला आलोय ना.. ती सुद्धा एक स्त्री आहे ना..मग एका स्रीरूपी देवीच्याच गाभाऱ्यात जायला एका स्त्री मज्जाव का..? तू एवढी शिकलेली आहेस मग तू सुद्धा ह्या विरोधात आवाज उठवायला हवा...एरवी तुमच्या स्त्री-पुरुष समानता जाग्या होतात ना मग इथे का नाही.. एखादा व्यक्ती ज्याच्यावर खून,बलात्कार,दरोडे असे गुन्हे दाखल असतात तो देवाचे दर्शन घेऊ शकतो ते सुद्धा व्ही.आय.पी रांगेतून.. पण त्यांचं ठिकाणी एका निष्पाप महिलेला त्या देवाच्या गाभाऱ्यात जाण्यास मनाई असते.. ही असमानता का..?? कुठली ही परंपरा आणि कुठली ही संस्कृती..?? (राधा तो जे काय बोलतोय त्याकडे तोंड उघड ठेवून ऐकतच असते)