माझ्या मामाचा गाव मोठा

  • 17.9k
  • 1
  • 6.6k

सायंकाळी शिरीषचे बाबा कंपनीतून घरी आले. शिरीष त्यांचीच वाट बघत दारातच उभा होता. बाबा आल्याबरोबर त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत ओढत आत घेऊन आला. त्याच्या बाबाला काही ही बोलायची संधी न देता सोफ्यावर बसवून म्हणाला, बाबा, आज की नाही, आमच्या शाळेत एक आजीबाई आल्या होत्या... असे सांगत पुन्हा सारे ऐकवून म्हणाला, बाबा, दिवाळीच्या सुट्टीत आपण मामाच्या गावाला जायचे म्हणजे जायचे... शिरीष हट्टाने तसे म्हणत असताना तिथे त्याची आई आलेली पाहून त्याच्या बाबांनी विचारले, अग, हा काय म्हणतोय, सोपे आहे का जाणे? शिवाय तिथे कुणी राहत नाही.... पण आपला मामा तर अधूनमधून जातोच ना, तसेच आपणही जाऊया. नाही तरी आपण नेहमी पिकनिकला जातोच ना, तसेच मामाच्या गावाला जाऊया.... शिरीष बोलत असताना त्याचे बाबा काही बोलू पाहत असताना त्यांना थांबायला सांगून शिरीषची आई म्हणाली,