सोराब नि रुस्तुम - 2

  • 6.7k
  • 3.6k

फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दूर दूर असलेल्या एका देशातील ही गोष्ट आहे. एक होता शेतकरी. त्याचे नाव होते खंडू. खंडूची बायको होती. तिचे नाव चंडी. चंडी नावाप्रमाणेच खरोखर होती. जणू त्राटिकेचा अवतार. ती सदा संतापलेली असायची. डोळे तारवटलेले, कपाळाला सतराशे आठ्या. घरात अक्षयी तिची आदळआपट चालायची. खंडूला वाईट वाटे परंतु काय करणार? घर सोडून जावे असे त्याला वाटे परंतु तेही बरोबर नाही असे त्याची सदसद्विवेकबुद्धी सांगे. ‘तुझी गाठ पडली आहे खरी अशा बायकोशी. आता भिऊन पळू नकोस. सहन कर सारे.’ असे सदसद्विवेकबुद्धी म्हणे.