जून महीना उजाडला होता.वातवरण ढगाळ झालं होतं.एप्रिल मे महिन्यात हाहाकार माजवलेल्या सूर्याचे तप्तरूप जमिनीत खोलवर जावून जमीन भेगाडली होती.त्यामुळे सूर्य जरी ढगाआड असला तरी, गर्मीमूळे अंगातून घामाचा पाट वाहत होता.माझे माय बाप मात्र पत्र फ्यारण्यामधे व्यस्त होते. माझा बाप घरावर चढून, पतरावरची मोठ मोठी दगड बाजूला सारून घरावरचे एक एक पतर मायच्या मदतीने खाली उतरवीत होता. खाली आणलेले पतर माय फड्याने स्वच्छ झाडत होती व फुटक्या ठिकाणी त्याची डागडुज करत होती. पतर साफ झाल्यावर पुन्हा ते पतर वर चढवून त्यावर माझा बाप दगड ठेवीत होता. मी मात्र पत्रावरच्या मातीत काही खेळण्याचे सापडते का,ते शोधीत होतो. मला खाली खेळताना बघून वरून