अनेक मुलींच्या नजरा त्याच्यावर होत्या. काहींनी प्रयत्न करूनही पाहीले पण जितके आकर्षण त्याच्या दिसन्यात होते, तितक्याच काही बाबी रहस्यमय वाटत होत्या. नयन मात्र कोणाच्याही अध्यात मध्यात राहायचा नाही. बोलण्याबद्दल फक्त दोन चार मित्र. बाकी त्याचे आयुष्य फारसे स्वतःमध्येच होते. यामागे कारण तसेच होते. नयनचे मन, गूण जरी वरवर पुरूषी दिसत असले तरी त्याच्या आत एक स्त्री दडलेली होती. नटने, मूरडने, लाजने, आरशात स्वतःला सारखे न्याहाळत बसने या गोष्टींनी नयनचे अंग मोहरून यायचे. त्याला सजायला, नटायला खुप आवडायचे. साडी, ओढणी या गोष्टीबद्दल त्याला विलक्षण आवड होती. घरी कोणी नसताना तो आपली आवड बर्याचदा पूर्ण करून घ्यायचा. पण या बाबतीत त्याने कोणालाही कधीही काहीही सांगितले नाही. समाज, आईवडील-बहीण, नातेवाईक काय सांगणार आणि कसे समजावे सर्वांना.