निर्भया- ११- -------------- राकेशच्या फ्लॅटकडे लक्ष होतं, हे लक्षात आल्यावर सुशांतला झालेला आनंद, त्यांच्या पुढच्या उत्तराने विरून गेला. "दीपा गेल्यावर कोणी आलं होतं का? " या त्यांच्या प्रश्नाला मराठेंचं उत्तर होतं, " कोणी आलं असेल तरी मला माहीत नाही. कारण मी पाच-दहा मिनिटातच पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो आणि अर्ध्या तासाने परत आलो." मराठे म्हणाले. " बरोबर आहे! दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं होतं, त्यामुळे कुठे जाता