निर्भया - १० त्या संध्याकाळी लॅबचे रिपोर्ट. आले. ग्लासमधील सरबतात विष होतं. आणि ग्लासवर राकेश आणि दीपा दोघांच्याही बोटांचे ठसे मिळाले होते. दीपाचे ठसे ग्लासवर मिळाले, म्हणजे तिच्यावरचा माझा संशय खरा ठरला. " मानेंच्या स्वरात त्यांचा संशय खरा ठरल्याचा आनंद होता. "तिने स्वतःच मला सागितलं, की निघताना तिने सरबत बनवून दिलं होतं. त्यामुळे तिच्या बोटांचे ठसे ग्लासवर असणं स्वाभाविक आहे, नाही का माने?" सुशांत म्हणाले. आज तिला पाहिल्यापासून तिचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून