ओनर ऑफ स्लिपरी होल

(70)
  • 15.2k
  • 13
  • 5.3k

ओनर ऑफ स्लिपरी होल "ऐक ना रे...थोड समजून घे ना...." अवंतीने विनवले. रडून रडून तिचे डोळे आणि गोरापान चेहरा लाल झाला होता. आसुंचे ओघळ गळ्यावरून ओघळून टॉपच्या कडा भिजलेल्या होत्या. पिंजरलेल्या तिच्या सोनेरी केसांना सावरायचही भान नव्हतं तिला. केविलवाण्या चेहऱ्याने ती बावरून राहुलकडे आर्जव करत होती. "काय ऐकायचं...?? आणि किती वेळा तेच तेच सांगायचं तुला ??" राहुलच्या स्वरात तीव्र नाराजी होती. चिडलेल्या राहुलचा गोरापान चेहरादेखील संतापाने लालबुंद झाला होता. कपाळावरच्या सूक्ष्म आठयांआडून एक शिर ताडताड उडत होती. "राहुल आय एम सॉरी..... रिअली.... बट यू अल्सो नो ना....." अवंती अजिजीने बोलायचा प्रयत्न करत होती. पण राहुल काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.