खरा मित्र - 4

(14)
  • 13.8k
  • 2
  • 3.9k

एक होता राजा. त्याला सर्व प्रकारचे सुख होते. त्याला कसली वाण नव्हती. एकच दु:ख होते व ते म्हणजे त्याला मूलबाळ नव्हते. राजा व राणी यामुळे नेहमी खिन्न व दु:खी असत. राणीने पुष्कळ उपासतापास केले, व्रतवैकल्ये केली परंतु तिची इच्छा पुरी होईना. राजवाडा संपत्तीने भरलेला होता. दारी हत्ती झुलत होते. घोडे होते, रथ होते. दासदासींना तोटा नव्हता परंतु मूल नव्हते. त्यामूळे सारे असून नसून सारखे असे राणीस वाटे.