निर्भया - ९

(27)
  • 8.8k
  • 5
  • 5k

                                       निर्भया- ९        निर्मलाबाईंनी-  दीपाच्या   आईने    दरवाजा उघडला.  समोर   पोलीसांना   पाहून  त्या   थोड्या घाबरल्याच!        "काय झालं? तुम्ही- कशासाठी आला आहात साहेब?" तिने चाचरत विचारलं."मी  इन्स्पेक्टर  सुशांत पाटील. दीपा  इथेच रहाते नं? तिला जरा  बोलावून  घ्या.""काय झालंय साहेब?" निर्मलाताईंनी विचारलं. त्यांचा आवाज थरथरत होता. " एका केसच्या संदर्भात  तिच्याशी  बोलायचं  आहे. "  सुशांत  म्हणाले. त्यांच्या स्वरात  पोलिसी   जरब   नव्हती , त्यामुळे निर्मलाताईंची भीती  थोडी कमी झाली.   " ती झोपली आहे."  त्या  म्हणाल्या.  " इतक्या उशिरा  पर्यंत?"  इन्स्पेक्टर   आश्चर्याने