आत्महत्या- एक भयकथा ( भाग 3) ( अंतिम भाग)

(70)
  • 11.3k
  • 11
  • 5.2k

आई ला सूचेना काय कराव... ती पळत देव घरात गेली. दत्त महाराजांना मनोमन नमस्कार केला. देवाजवळील विभूती मूठीत घेऊन ती बाहेर आली आणि मंजिरी च्या दिशेने बघून जोरात फुंकली तस मंजिरी ने जोरात किंकाळी फोडली आणि बेशुद्ध झाली. बाबा खाली कोसळले. त्यांचा गळा पूर्ण सूकून गेला होता. बाबा जोरजोरात खोकत होते. ' अहो.. अहो... ' म्हणत आई ने बाबाना पकडले. ' पाणी... पाणी ' बाबा बडबडत होते. लगेच भाऊ पळत जाऊन पाणी घेऊन आला आणि बाबाना पाणी पाजवू लागला. बर्याच वेळाने बाबा शांत झाले. त्या रात्री कोणीच झोपले नाही. घडयाळयात ६ चा ठोका पडला तशी आई काही तरी ठरवून उठली आणि बाहेर जायला दरवाजा उघडू लागली.