निर्भया- ८ त्यादिवशी सकाळी इन्स्पेक्टर सुशांत पाटील खूप उशिरा उठले. कालचा पूर्ण दिवस धावपळीत गेला होता. उत्तर प्रदेशात खंडणी आणि खुनासाठी पोलिसांना हवा असलेला एक सराईत गुंड मुंबईत आला होता आणि इथल्या एका झोपडपट्टीत लपला होता. झोपड्यांचं गच्च जाळं असणा-या त्या विभागात त्याला शोधणं जेवढं जिकीरीचं होतं, तेवढीच ती जिवावरची जोखीम होती. तिथे नेहमीच अनेक अट्टल गुन्हेगारांना आसरा दिला जात असे. त्यांना शोधायला आलेल्या पोलिसांवर हल्ले झाल्याच्याही अनेक घटना घडल्या होत्या. पण त्या खतरनाक एरियात बेडरपणे जाऊन सुशांतने ती मोहीम यशस्वी करून दाखवली होती. खुन्याला बेड्या घालून