आत्मविश्वास

(18)
  • 5.7k
  • 6
  • 1.7k

आत्मविश्वास ढासाळायला लागतच काय ? काळीज पिळवटून टाकणारी एक घटना.. काळजाच्या आरपार घुसणार एखाद वाक्य.. जवळच्याने केलेला विश्वासघात.. सर्वांसमोर झेलावा लागणारा अपमान. एक क्षण पुरेसा असतो , एखाद्याच खच्चीकरण व्हायला पण तोच आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी , पुन्हा त्याच आत्मिक पातळीवर , वैचारिक पातळीवर पोहचण्यासाठी मात्र खूप काळ लागतो. (पण प्रत्येकाला त्यातून बाहेर पडताच येईल अस नाही.) एक संघर्ष करावा लागतो काल आणि आज मध्ये.. सतत द्वंद्व धुमत राहत बुद्धी आणि मन यामध्ये. सकारात्मकता आणि नकारात्मकता यांचे पारडे वर खाली होत राहते. मी चांगला कि वाईट ? मी चूक कि बरोबर ? मी मूर्ख कि हुशार ? अशा किती तरी