संपूर्ण बाळकराम - 13

  • 7.6k
  • 2.6k

(दामू कोशांतून शब्द काढीत आहे एका बाजूला दिनू भूगोल घोकीत आहे प्रत्येकाजवळ पुस्तके व वह्या पडल्या आहेत जवळच कपडे पडले आहेत.) दामू : (डिक्शनरीत पाहतो) एफ ए बी एल ई, एफ ए- दिनू : (मोठयाने) खानदेश जिल्ह्यातील तालुके- (तीनदा घोकतो.) धुळे, अमळनेर, एरंडोल, पाचोरे, धुळे, अमळनेर, एरंडोऽल- दामू : एफ एबी एल ई फेबल म्हणजे कल्पित गोष्ट. (लिहू लागतो.) दिनू : धु-ळे, अमळनेर- दामू : दिन्या, हळू घोकणा रे! माझा शब्द चुकला की इकडे! हे बघ, फेबल म्हणजे कल्पित नेर झाले आहे. हळू घोक. (शब्द पाहू लागतो) बी ई ए यू-