(स्थळ : विक्रांताच्या घरातील माजघर. पात्रे: ठमाबाई, उमाबाई, भामाबाई, चिमाबाई वगैरे बायका व आवडी, बगडी वगैरे परकर्या पोरी, बाळंतपदर घेतलेली व पिवळीफिक्कट अशी विक्रांताची आई, मध्यंतरी टांगलेला पाळणा पाळण्यात बारा दिवसांचा विक्रांत.) सर्व बायका : पद - (चाल- हजारो वर्षे चालत आलेलीच.) गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी। गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी। ('नाही मी बोलत नाथा' हा चरण जितके वेळा म्हणण्याचा साधारणपणे प्रघात आहे तितके वेळा हेच एकसारखे, प्रेक्षकांस कंटाळा येईपर्यंत घोळून म्हणतात.)