गप्पा दोन गणपतींच्या.....

  • 10.9k
  • 3.4k

आर्या आशुतोष जोशी गप्पा दोन गणपतींच्या..... गजानन , विनायक, हेरंब, अमेय आणि गणेश हे पाच जण एकमेकांचे घट्ट मित्र होते. गणेशोत्सव संपला आणि हे सगळे गणपतीबाप्पा आपापल्या घरी परत आले. भरपूर मोदक खाऊन गलेलठ्ठ झाले होते सगळेच, आधीच मोठ्ठं पोट ते आणखीनच मोठ्ठं झालं होतं. आईने घरून निघतानाच सांगितलं होतं की “ मोदक आवडतात म्हणून तेच खाऊ नका.”