चारठाण्याचे शिल्प वैभव: बरेचसे अप्रसिद्ध

  • 6.6k
  • 1
  • 1.9k

चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे, अगदी माळदाचे. ‘माळद’ हा छप्पराचा एक प्रकार असतो. मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात खजीनादागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर माणूस( हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही ह्या घराच्या माळदात लपवले होते असे मला सांगितले) लपवता येतो. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना, झोपताना वरून साप अंगावर पडणे इथल्या लोकाना