सुंदर कथा - 2

(11)
  • 7.8k
  • 4.5k

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगितला. आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर! ती रडत म्हणाली. तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे. तो म्हणाला. राणी काय करणार, काय बोलणार? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये! तुमची आज्ञा प्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले.