परसू : एक अनाम क्रांतिकारक आपल्या मातृभूमीसाठी लढलेल्या अनेक शूर वीरांची गोडवी गाताना अंगावर एक रोमांच उभा राहतो.आपले कर्तव्य बजावताना वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्या-या वीर जवानांच्या,देशभक्तांच्या समोर नेहमीच आदराने मान झुकते.इतिहासातील अनेक सुवर्ण पटले या अश्याच पराक्रमी, थोर, वीरांच्या पराक्रमांनी भरलेली आहेत.पण काही नावे तर अशीही आहेत, जी या सगळ्यांच्या पाठीमागे कुठेतरी नकळत लपूनच राहिली.ना कधी त्यांची आठवण काढण्यात आली ना त्यांचे नाव कोणत्या पानावर विराजमान झाले.ते अनामच जगत राहिले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.या अनाम क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची अक्षरशः होळी केली होती.त्यांनी आख्खे आयुष्य पणाला लावले.हे असे अनाम क्रांतिकारक पाठीशी होते म्हणून तर लढायला पुढे असणा-या त्यांच्या नेत्यांच्या हातात दहा हत्तीचे