१४. लिटमस..- यावेळी देखील देवाकडे कोणताही कौल न मागता अनघा देवाने लिहिलेल्या स्क्रिप्ट नुसार जगायचं ठरवते. केवळ आठवड्याभराच्या ओळखीत आपल्यासाठी मरायला तयार असणाऱ्या विशालचे प्रेम स्वीकारण्याचा ती निर्णय घेते. यावेळेस अनघाच्या मनातला लिटमस रंग बदलत नाही. तिला न्यूट्रल वे सापडतो. विशाल आणि अनघाला घेऊन हेलिकॉप्टर हवेत भराऱ्या घेत दिसेनासे होते.