माया महाजाल अनिरुद्ध बनहट्टी “काय म्हणतात? महाजाल?” “हो! इंटरनेटला मराठीत महाजाल म्हणतात!” “गंमतच आहे!” “हो, आणि बेवसाईटला संकेतस्थळ!” “ओ होऽऽ! हाऊ रोमँटिक!” “ते जाऊ दे, आता कर बरं टाईप, अन उघडून दाखव तुझं पेज फेसबुक वरचं! नायतं थांब, मी काँप्युटर पूर्णबंद करते, मग पहिल्यापासून काँप सुरू करून एफबी वरचा अकाउंट आणि स्वतःचं पेज उघडेपर्यंत सगळं जमलं पाहिजे तुला!” “ठीक आहे.” वनिता - म्हणजे स्पेलिंगमध्ये वनिथा - कारण ती आंध्रातली होती-सायलीवर खूष झाली. भराभर सायलीनं काँप ऑन करून गूगल क्रोम मधून एफबी वर लॉग ऑन केलं आणि शाबासकीसाठी एखाद्या हुशार विद्यार्थ्यानं मास्तरकडे पहावं तसं वनिताकडे पाहिलं. “व्वाऽऽऽ! आणि मधेच मायक्रोसॉफ्टचे दोन