“hi” “hi” “अरे एकटा का बसला आहे अनू कुठंय?” “मला काय माहिती कुठं गेलीय?” “अरे कुठे गेलीय म्हणजे काय? गर्लफ्रेंड आहे ना तुझी मग?” “hmmm..” “hmmm काय? ते म्हशीसारखं hmmm hmmm करणं बंद कर. आधी सांग कुठे गेलीय ती.. माझं काम आहे तिच्याकडे” नेहा ऋषीला विचारत होती पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. “पुन्हा भांडलात की काय दोघं?” नेहानं विचारलं. यावर ऋषी काहीच बोलला नाही. त्यांचं शांत बसणं नेहाला बरंच काही सांगून गेलं. “अरे किती भांडता तुम्ही दोघंही… सतत भांडणं सुरू असतात तुमची.. भांडतच बसणार की प्रेम पण करणार तुम्ही?” नेहानं ऋषीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. “मग काय करू ती