फन्ने खान- अभिनयासाठी पाहावा असा चित्रपट..

  • 6.5k
  • 2.1k

फन्ने खान चं कथानक आशा-आकांक्षा...स्वप्नं आणि नात्यांभोवती गुंफलेलं आहे. हा चित्रपट एवरीबडी इज फेमस ह्या Belgian सिनेमाचा रेमेक आहे. प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी झटत असतो आणि तेच ह्या चित्रपटातून अधोरेखित केलेलं आहे. मुलीला देशाची गानकोकिळा करण्यासाठी आणि तिला एक मोठं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या आणि कोणत्याही थराला जाणाऱ्या एका वडिलांची ही गोष्ट आहे.