ती चं आत्मभान .. 10

(11)
  • 4.9k
  • 2
  • 1.8k

१०. झरोक्यातला एक कवडसा..- आर्याने शालेय शिक्षण तर पूर्ण केलेच पण नाट्यशास्त्राची पदवी घेतली. आज तर तिला नाट्यशास्त्र विषयातल पदव्युत्तर पदवीसाठी असलेल विद्यापिठाच सुवर्णपदक मिळत आहे. धन्य झाले मी! माझ्या आर्याने करून दाखवल. जी मुलगी शाळेत जाण्यास तयार नव्हती ती आज उच्चपदवीधारक झाली. इतक्यात स्कूटीचा हॉर्न वाजला आणि मालतीताई भानावर आल्या. आर्या उत्साहाने धावत घरात आली आणि म्हणाली आई तुला आज दोन आनंदाच्या बातम्या आहेत आणि त्या म्हणजे मला इंग्लंडमधील नाट्यशास्त्राची मानाची ३ महिन्याची शिष्यवृत्ती मिळतीय आणि परत आल्यावर मला एका मोठ्या निर्मितीसंस्थेकडे काम करण्याची संधी मिळतीय.