ती चं आत्मभान... 9

(13)
  • 5.1k
  • 2.3k

९. अजूनही लढा चालू आहे..- गिरीजाच लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी झालं आणि गिरीजा नवीन घरात सुखाने संसार करायला लागली. तिचं आयुष्य एकदम मस्त चालू होतं. तिच्या घरातले सगळे लोकं म्हणजे तिचा नवरा- निकेतन, तिचे सासू सासरे सगळेच एकदम मस्त होते. पाहता पाहता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली आणि बाळाची चाहूल लागली. बाळाची चाहुल लागल्यावर गिरीजा तर इतकी खुश झाली. आता त्यांचा परिवार पूर्ण होणार होता. त्यांच्या घरातले सुद्धा सगळे खुश होते.