प्रपोज..-२

(21)
  • 8.3k
  • 1
  • 4.7k

चौघ तसे एकमेकांच्या संपर्कात होतेच पण गौतम आणि रिया जास्ती क्लोज असल्यामुळे ते एकमेकांच्या जास्तीच संपर्कात होते.. बऱ्याच वेळा भेट व्हायची किंवा मेल, फोन वर दोघ संपर्कात होतेच. म्हणजे दोघांच अधून मधून फोन किंवा मेल आणि भेटण चालूच होत! गौतम नी रिया ला फोन करून भेटायला बोलावलं.. “हे रिया आलीस..“ “येस. तू बोलावलं आणि मी येणार नाही अस होईल का गौतम आय नो.. मी बोलावलं आणि तू आली नाहीस अस कधीच होणार नाही. कॉलेज पासून जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असायची तेव्हा तेव्हा तू माझ्या बरोबर असायचीसच. कॉलेजचा विषय निघाला आणि आठवलं, कॉलेज संपल आणि आपल सगळ्यांचच आयुष्य किती बदललं ना रिया