प्रपोज..१

(45)
  • 13.6k
  • 10
  • 6.4k

“आज रिझल्ट! मला टेन्शन नाहीये पण काहीतरी विचित्रच वाटतंय...”आभा बोलायला लागली.. “हो ना.. मला तर जाम टेन्शन आलाय... फर्स्ट क्लास कि डीस्टिनक्शन... भीती वाटतीये! आत्तापर्यंत डीस्टिनक्शन मिळालाय प्रत्येकवेळी..पण आत्ता काय होतंय काय माहित!” रियानी आभाला उत्तर दिल. रिया खूप हुशार पण तितकीच घाबरट.. रिया..तू टेन्शन काय घेतेस...नेहमी तू टॉप करतेस आपल्या चौघात.... रियाला टप्पल मारत आभा बोलली.