६. स्वज्योत- गार्गी आणि जुई दोघी जिवाभावाच्या मैत्रीणी, अगदी लहानपणापासूनच्या. शाळेत जी घट्ट मैत्री जमली ती छान जमलीच. दोघी एकत्रच वाढल्या. शिकल्या, स्वप्ने पाहीली. दोघीही हुशार , मनमिेळाऊ, बोलक्या. यथावकाश दोघींची लग्ने झाली. दोघी दुरावल्या. दोघींना एकमेकींची इतकी सवय होती त्यामुळे दोघींना सुरुवातीला जड गेले. पण त्यावरही दोघींनी मार्ग शोधला. पत्रे लिहून भेटीची तहान पत्राद्वारे भागवू लागल्या. पहिली काही महीने लंबीचवडी पत्रे आणि त्या मधे नवऱ्याच्या , सासरच्या गोष्टी असायच्या. दोघी पत्रातून मन एकमेकींसमोर मन मोकळ करायच्या.