५. परिवर्तन घडतांना- प्रत्येक मुलगी काही स्वप्न उराशी बाळगून जगत असते. कधी झटत असते कधी समाजाशी लढा देत असते. अनिशा सुद्धा बरीच स्वप्न उराशी बाळगून जगत होती. अनिशा दिसायला तशी रूपवान. कोणावरही सुंदर छाप पडेल अस वागण बोलण अनिशाच होत. अनिशाचं कॉलेज पूर्ण झाल ते अगदी आरामात. आणि तिला मनासारखा जॉब लगेचच मिळाला. अनिशा खुश होती. मनासारखं शिक्षण पूर्ण झाल्यावर मनासारखा काम करता येणार ह्या गोष्टीचा अनिशाला आनंद झाला होता. जॉब चालू होऊन थोडे दिवस झाले. काही दिवसातच तिला प्रमोशन मिळाल.