ती चं आत्मभान .. 4

(16)
  • 5.2k
  • 4
  • 2.1k

४. नित्या- विश्व हिंदू विद्यालयाच्या गेट मधून गाडी आत गेली. पार्किंग मध्ये त्यावेळी तशी फारशी वर्दळ नव्हती नित्याने गाडी पार्क केली आणि ती तशीच बसून राहिली. तिची नजर काहीतरी शोधत होती आणि छातीत कमालीची धडधड होत होती. टेन्शन वाढलं की नखांच्या बाजूला असणारी क्युटिकल्स कुरतडण्याची तिला वाईट सवय होती नकळत आताही ती तेच करत होती. गाडीत पुन्हा एकदा मागे वळून तिने खात्री करून घेतली की, सोबत आणलेल्या साऱ्या वस्तू नीट मागच्यासीट वर तर आहेत ना.. हंम्म...! सारे व्यवस्थित होते.