श्यामची आई - 42

(13)
  • 7k
  • 6
  • 2k

गड्यांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवावयाचा आहे. माझ्या आईवर बायामाणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोर्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येई.