श्यामची आई - 36

  • 6.7k
  • 1
  • 1.6k

आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस भिकाने विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले. गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. अलिकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला. सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न