आयुष्य कस जगाव आयुष्य नेहमीच साधेपणानी जागाव अस सांगितलं जात पण साधेपणानी आयुष्य बऱ्याच वेळा जगता येतच नाही. आयुष्य साधेपणानी जगल तर आयुष्याची मजा प्रत्येक क्षणी अनुभवता येते नाहीतर आयुष्यात ताण वाढू शकतात. बरेच वेळा दलदलीत फसाव तस काही गोष्टीत अडकले जातो. आणि आयुष्य कठीण होऊन बसत. बऱ्याचवेळा ठराविक पद्धतीनी आयुष्य जगण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. त्यांना चौकट सोडून कधी बाहेर पडताच येत नाही. किंवा त्यांना तस करायची इच्छा असते पण त्यांच मन धजावत नसत! पण एक गोष्ट नक्की आहे कि, आयुष्य उत्तम रित्या जगण्यासाठी साधेपणानी जगण आणि आहे त्यात आनंद मानण हे अत्यंत गरजेच आहे.