श्यामची आई - 3

(19)
  • 14.5k
  • 1
  • 5.4k

श्यामची आई - रात्र तिसरी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने मुकी फुले बारकू, भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले. आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई. जा उपाशीच. नाहीतर आल्यावर भाकर खा. बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जलदीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते.