संगीत शारदा - अंक - 3

  • 11.7k
  • 1
  • 3.6k

संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल अंक तिसरा प्रवेश पहिला ( स्थळ : कुबेरांचा वाडा ) ( मंदाकिनी, वल्लरी, तुंगा, त्रिवेणी, जान्हवी, शरयू वगैरे मुली गौरीची मांडणावळ मांडून ) मंदाकिनी : आतां बायकांना म्हणावं हवं तेव्हां या. आमच्याकडून तयारी आहे. वल्लरी, तें वाळ्याचं अत्तर गंघांत घातलंस ना ? वल्लरी : हो हो, बघ हवं तर ! ( वास दाखविते । शरयू : मंदाकिनी, पोरीसोरींना सरसकट एकेक तुरा द्यायचा म्हणतेस, पण तुरे सगळे हतकेच ना ? मंदाकिनी : ते कां ? माळ्याला आणखी इतके आणायला सांगितले आहेत. बरं, आतां मांडणावळींतलं कांहीं राहिलं नाहीं ना ? बघतें हो. अग सगळंच मुसळ केरांत ! गौरीपुढें मिठाईचं तबक ठेवायला विसरलोंच. शरयू, जा बरं तेवढं घेऊन ये.